spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

पाटोद्यात महावितरण कर्मचार्‍याला बेदम मारहाण

महावितरण कार्यालयात तोडफोड
बीड : महावितरणकडून कामाचा ठेका देण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुजोरी पाहण्यास मिळाली आहे. कंत्राटदाराने थेट महावितरणच्या कार्यालयात घुसून कर्मचार्‍यास मारहाण केली. इतकेच नाही तर कार्यालयातील संगणक, खुर्च्यांसह साहित्याची तोडफोड देखील केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या विरोधात महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले आहे.
बीडच्या पाटोदा येथील महावितरण कार्यालयात हा प्रकार घडला आहे. कार्यालयात असलेले लाईनमन किरण नाईकनवरे यांना कंत्राटदार राहील सलीम शेख याने वडील व भाऊला सोबत घेत मारहाण केली आहे. झाडं तोडणीच्या कामाची माहिती दिल्यामुळे आमचे बिल थकले आहे; असे म्हणत शिवीगाळ करून महावितरण लाईनमन यांना बेदम मारहाण करण्यात आले आहे. यामध्ये लाईनमन नाईकनवरे हे जखमी झाले आहेत.
लाईनमन नाईक नवरे यांनी सदरील कंत्राटदाराच्या विरोधामध्ये चुकीचे काम केल्याप्रकरणी अहवाल पाठवत असताना दिलेल्या माहितीचा राग मनात धरून कंत्राटदाराकडून लाईनमन यांना मारहाण करण्यात आली. तसेच कार्यालयातील साहित्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मारहाणीत जखमी झाल्यानंतर पाटोदा पोलिस ठाण्यात तक्रार देऊन वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना दुसर्‍यांदा शेख यांनी मारहाण केली.
दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे महावितरणचे कर्मचारी संतप्त झाले होते. यानंतर आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी बाजारतळ परिसरात रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. आक्रमक कर्मचार्‍यांनी संबंधित कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कंत्राटदाराला अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. यामुळे वातावरण तापले आहे.

ताज्या बातम्या