गेवराई – दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात गेवराईतील दोन ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी गेवराई-शेवगाव राज्य रस्त्यावरील सुकळी फाट्यावर घडली.
नितीन रावसाहेब केसभट रा. गायकवाड जळगाव व सुनिल चव्हाण रा. कुंभेजळगाव- रामनगर तांडा, ता. गेवराई, जि. बीड अशी या अपघातात मृत झालेल्याची नावे असून, सुभाष काजळे हा जखमी झाल्याने त्यास शेवगाव येथील रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे.
शेवगाव (जि. अहिल्यानगर) दुचाकीवरुन गेवराईकडे येत असलेले केसभट व चव्हाण यांच्या दुचाकीची समोरील येणा-या दुचाकीस समोरासमोर सुकळी फाट्यावर धडक झाली. यात गेवराईतील नितीन केसभट व सुनिल चव्हाण हे दोघे जागीच ठार झाले. तर सुभाष काजळे हे गंभीर जखमी झाले.
सदरील घटना काल सोमवारी शेवगाव-गेवराई राज्य रस्त्यावरील सुकळी फाटा येथे घडली. अपघाताची माहीती पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. दुर्घटनेची पाहणी करून मृताचे मृतदेह शेवगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनास दाखल करण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मृत केसभट व चव्हाण यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.