spot_img
30.3 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

spot_img

शिक्षिका प्रशिक्षणाला कर्मचार्‍याने मुलींबरोबर

अकोला: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील कौलखेड भागातल्या एका शाळेत एका कर्मचार्‍याने तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणार्‍या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांच्या तक्रारीवरून हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर या आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिक्षण घेणार्‍या दहा विद्यार्थिनींशी शारीरिक लगट करत विनयभंग केला.
शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर सदर विद्यार्थीनींकडून प्रकार शिक्षकांच्या कानावर पडला. यानंतर शिक्षकांनी हा प्रकार शाळेच्या संचालकांच्या कानावर टाकला. संचालकांनी या प्रकाराची तक्रार लगेच चाईल्ड हेल्पलाइनला केली. दरम्यान, या प्रकरणी आरोपी हेमंत चांदेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
सदर शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर या आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेतला. आरोपी हेमंतने इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये शिक्षण घेणार्‍या दहा विद्यार्थीनींचा विनयभंग केला. ज्यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका प्रशिक्षण दौरा आटोपून आल्यानंतर पीडित विद्यार्थीनींनी घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. यानंतर तातडीने शाळेतील संचालकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती चाईल्ड हेल्पलाइनला दिली. पोलिसांनी आरोपी हेमंत चांदेकरला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या