बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो.लि. बीड चे आरोपी संचालक मंडळ व इतर अधिकारी / कर्मचारी यांचे नावावर असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांची मा. नोंदणी महानिरीक्षक, यांचे कार्यालय, पुणे येथुन व स्थानिक सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे बीड जिल्हयातील विविध शाखे मधुन माहिती प्राप्त केली असता सदर मल्टीस्टेट मधील चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांचे नावे असलेली स्थावर मालमत्तेची माहिती प्राप्त करुन ४२,१७,४९० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे सदरील प्रकरण पुढील कारवाईसाठी अपर पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि.बीड चे बीड जिल्हयात २३ शाखा असुन सदर मल्टीस्टेट विरूद्ध बीड जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला आजपावेतो ७६ गुन्हे दाखल झाले असुन फिर्यादी मधील एकुण ४७,९९,९२,३६८/- रूपयाचा अपहार झाले बाबत तक्रारीमध्ये नमुद आहे. तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे आजपावेतो आर्थिक गुन्हे शाखा, बीड येथे एकुण ११५२७ ठेवीदार त्यांच्या एकुण- ६६०,१९,९९,०६९ /- रूपये रकमेची विश्वासघात व फसवणुक झाले बाबत तक्रारी व त्याबाबतचे पुरावे या शाखेत दिलेले आहेत. त्यावरून गुन्हयाचे तक्रारी मधील व प्राप्त ठेवीदार यांचे अर्ज असे एकुण-७०८,१९,९१,४३७ /- रूपये रकमेची फसवणुक झालेबाबत माहिती आजपर्यंत प्राप्त झालेली आहे. व त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ठेविदार यांचे तक्रारी अर्ज स्वीकारण्यासाठी आगुशा बीड येथे स्वतंत्र पथक तयार करण्यात आलेले आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो.लि. बीड चे आरोपी संचालक मंडळ व इतर अधिकारी / कर्मचारी यांचे नावावर असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांची मा. नोंदणी महानिरीक्षक, यांचे कार्यालय, पुणे येथुन व स्थानिक सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे बीड जिल्हयातील विविध शाखे मधुन माहिती प्राप्त केली असता सदर मल्टीस्टेट मधील चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांचे नावे असलेली स्थावर मालमत्तेची माहिती प्राप्त करुन एमपीआयडी प्रस्ताव पुढील कायदेशीर कारवाईसाठी जा.क्र.वाचका/आ.गु.शा./रा.म/एमपीआयडी /प्रस्ताव/२०२५- ४१५ बीड दि. १७/०३/२०२५ अन्वये. मा.अपर पोलीस महासंचालक, म.रा.मुंबई यांचे कार्यालयात पाठवण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये चार वाहने (जीप), तीन सीपीयु व मुख्य कार्यालय बीड येथुन महत्त्वाचे दस्तऐवज असा एकुण रुपये ३२,८०,०००/- रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मुख्य शाखेचा पंचनामा करून ६,३४,३९०/- रोख रक्कम तसेच सारडा संकुल शाखेतुन ७३ ग्रॅम सोन व अंदाजे २५० ग्रॅम चांदीच्या मौल्यवान वस्तु जप्त केले असुन त्याची एकुण-किंमत- ३,०३,१००/-रू किंमतीचे मौल्यवान दागीने जप्त करण्यात
आलेले आहे त्यांची एकुण किंमत- ४२,१७,४९० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.
तसेच सदर गुन्हयामध्ये आजपावेतो संचालक मंडळातील व इतर अधिकारी कर्मचारी यांचे एकुण-२५६ बँक खाते निष्पन्न केलेले आहे. त्यापैकी चालु स्थितीत असलेले बँक खाते ४७ आहेत त्यापैकी ४४ बँक खाते फ्रिज केलेले असुन त्यामध्ये ६९,२८,६३६/- रूपये फ्रिज करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संस्थेतील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (चझखऊ Aउढ) १९९९ अन्वये पुढील कार्यवाहीसाठी एमपीआयडी प्रस्ताव मा. अपर पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे कार्यालयात पाठवण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी मा.विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छ.संभाजी नगर परीक्षेत्र, छ. संभाजीनगर, मा. नवनीत कॉंवत, पोलीस अधीक्षक बीड, मा. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, विश्वांभर गोल्डे उपविपोअ बीड तथा पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ, सहा. पोलीस निरीक्षक, पांडुरंग भागीले, सपोनि रत्नाकर घोळवे, व पोलीस अंमलदार सहा फौजदार मुकुंद तांदळे, मच्छिंद्र राख, अभिमान भालेराव, पोलीस हवालदार रामदास, विठठल, पोशि. संजय पवार व इतर अंमलदार यांनी केलेली आहे.