spot_img
20.4 C
New York
Monday, June 15, 2026

Buy now

spot_img

भाजपाचे विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या २७ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी आज भाजपाकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना भाजपाकडून संधी देण्यात आली आहे.
महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय आज शिंदे गट आणि अजित पवार गटही त्यांचे उमेदार जाहीर करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या