spot_img
6.1 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

बीड जिल्ह्यात ९३६४ लाडक्या बहीणी अपात्र

लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत. तर बीड जिल्ह्यात ६३६४ लाडक्या बहीणी अपात्र झाल्या आहेत.
मराठवाड्यातील २१ लाख ९७ हजार २११ पैकी ५५ हजार ३३४ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर ५४ हजार ५९८ अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही. विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणार्‍या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागातून २३ लाख ७ हजार १८४ महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील २१ लाख ९७ हजार २११ अर्ज वैध ठरले. ५४ हजार ५९८ अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत. आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच हयातीचा दाखलादेखील महिलांना द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील. छत्रपती संभाजी नगरमध्ये ६६५५ महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.धाराशिवमध्ये २५३३ महिला अपात्र ठरल्या आहेत. लातूरमध्ये ८००१ तर जालन्यात ९६२२, हिंगोलीत ५८२५ महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. परभणीत २८०२,बीडमध्ये ९३६४ तर नांदेडमध्ये १०५३२ महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

ताज्या बातम्या