spot_img
6.1 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

बीड सायबर पोलिसांनी फसवणूक झालेले अडीच लाख मिळविले परत

बीड : पाटोदा तालुक्यातील माऊलीनगर येथे राहणार्‍या सत्यवान रोंढे यांची अडीच लाख रूपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाली होती. बीड सायबर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन त्याच्याकडून फसवणूक झालेली रक्कम परत मिळविली . सदर कामगीरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर , यांचे मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
लोड करुन सबमीट केले. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडीया खाते क्रमांक 31135190236 IFSC SBIN0011509 share karo lit (yono app) या ऍपद्वारे तक्रारदार यांची २६००२३.६८/- रु. ची ऑनलाईनद्वारे फसवणुक झालेली रक्कम सायबर पोलीस स्टेशन, बीड यांनी तांत्रीक पध्दतीने तपास करुन परत मिळवली
दि. २६/०४/२०२४ रोजी तक्रारदार श्री सत्यवान मधुकर रोंढे रा. माऊलीनगर, पाटोदा जि. बीड यांनी स्वत च्या मोबाईल मध्ये डहरीश ज्ञरीे श्रळीं या अपवर एक लिंक प्राप्त झाली. सदरची लिंक तक्रारदार यांनी ओपन केली असता, त्यामध्ये yono app हे ओपन झाले. तक्रारदार यांची यापुर्वी yono app हे बंद पडलेले होते. तक्रारदार यांनी बंद पडलेले yono app  हे चालु करण्यासाठी त्यांनी त्यांचे युजर नेम व पासवर्ड टाकला असता, त्यांना OTP प्राप्त झाला. yono app चालु करण्यासाठी त्यांनी जढझ क्रमांक त्यामध्ये अपलोड करुन सबमीट केले. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडीया खाते क्रमांक 31135190236 IFSC SBIN0011509 यामधुन 260023.60 रुपये परस्पर कट झाले बाबतचा संदेश प्राप्त झाला. यावरुन त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधला असता, बॅक मॅनेजर यांनी सांगीतले की, तुमच्या सोबत ऑनलाईन फसवणुक झली आहे.  तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, येथे तक्रार देण्यास सांगीतले, यावरुन सदर तक्रारदार यांनी सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे share karo lit (yono app) या अपविरुध्द घडलेल्या घटनेची लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारदार श्री सत्यवान मधुकर रोंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन, बीड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रीक पध्दतीने तपास करुन तक्रारदार यांची ऑनलाईने पध्दतीने फसवणुक करुन घेतलेले एकुण २६००२३.६०/- रुपये ही तक्रारदार यांचे खातेमध्ये परत मिळवुन दिली आहे.
सदर कामगीरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गात, पो.नि. घोडके, पो.उपनि कासले, पो.ह. बप्पासाहेब दराडे, विजय घोडके, अनिल डोंगरे, पंचम वडमारे, गणेश घोलप, रामदास गिरी, पो.ना. श्रीकांत बारगजे, दत्तात्रय मस्के, पो.अं./ प्रदिपकुमार वायभट, अजय जाधव, अमोल दरेकर, निलेश उगलमुगले व महीला पोलीस अंमलदार- खरात, शिंदे, औसरमल, काशिद, गवते, चादर सर्व सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.
सर्व नागरीकांनी ऑनलाईन पध्दतीने आर्थिक व्यवहार करताना, आलेले फोन, SMS, ची खात्री करुनच व्यवहार करावा व तात्काळ १९३० वर संपर्क करावा असे सायबर पोलीस स्टेशन, बीड तर्फे आवाहान करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या