बीड : खासदार सुप्रिया सुळे आज सकाळी मस्साजोग या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी वैभवी देशमुख यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. यावेळी देशमुख कुटुंबिय भावुक झाले. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही सुप्रिया सुळे भेट घेणार आहेत. गावकर्यांनीही गावात भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर हे उपस्थित आहेत. या सर्वांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.