केज : खाजगी शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचा विडा ते पिंपळगाव या दरम्यान मृतदेह आढळून आला. शिक्षकाचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
विदा कराड शाळेवर शिक्षक असलेले पंडितराव भोसले यांचा मृतदेह विडा ते पिंपळगाव रस्त्यावरील कल्याणवाडी फाट्यावर आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. भोसले यांच्या चेहर्यावर वर डोक्याला जखमा होता. त्यांचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला की अन्य कशाने या बाबतचा तपास केजचे पोलीस करत आहेत.