अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे रविवार दि.१९ जानेवारी रोजी पब्लिक प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रोग्रामसाठी जास्तीत जास्त सहजयोग साधकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
परमपूज्य माताजी यांच्या परम कृपेत श्रीगोंदा येथे सहजयोग प्रचार प्रसारा निमित्त मेगा पब्लिक प्रोग्राम आयोजित केला आहे. या पब्लिक प्रोग्राम मध्ये सात घोड्यांच्या रथावर अभूतपूर्व रॅलीचे आयोजन केले आहे.रॅली ही ४ ते ५ या वेळेत संपूर्ण शहरा मधून फिरणार आहे. त्यानंतर महादजी शिंदे विद्यालय,श्रीगोंदा येथे संध्याकाळी ६.३० वाजता कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार मेगा पब्लिक प्रोग्राम होणार आहे. तरी सर्व सहजयोगी दादा-ताईंना सूचित करण्यात येत आहे की सर्वानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहज योगाचा प्रचार प्रसार करावा व या रॅलीची शोभा वाढवावी. मेगा पब्लिक प्रोग्रामचे पोस्टर लावण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे.