spot_img
1.3 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

परळीत राखेच्या टिप्परने सरपंचाला उडविले

परळी : राखेची वाहतूक करणार्‍या टिप्परने दुचाकी स्वाराला धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यु झाल्याची घटना (दि.११) रोजी रात्री परळी तालुक्यातील निरवट येथे घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा परळी मधील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
परळीत राखेची वाहतूक करणार्‍या टिप्परने मोटरसायकल स्वाराला धडक दिली. या अपघातात तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यु झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने क्षीरसागर यांचा जागीच मृत्यु झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदना येथे त्यांच्या गावाकडे शेतातली कामे उरकून ते परळी कडे जात असताना साडेआठ वाजता मिरवट फाट्यावर त्यांना राख वाहतूक करणार्‍या टिप्परने धडक दिली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. टू व्हीलर गाडीचा चक्काचूर झाला आहे.

ताज्या बातम्या