भजन सम्राट डॉ. संदीप दलाल व मिलिंद दलाल देणार भजनांची सुमधुर प्रस्तुती*
परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या परम कृपेत सहजयोग ध्यान साधना केंद्र चिमूर तर्फे दिनांक 12 जानेवारी 2025 रोज रविवारला सकाळी 11 वाजता नवीन वर्षाच्या शुभ-पर्वावर सहज भजन कार्यक्रमाच्या माध्यमातून सहज योग प्रचार प्रसार व आत्मसाक्षात्कार कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे.
सहजयोग समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य विश्व पातळीवर सहजयोग परिवाराच्या वतीने निरंतर सुरू आहे, अशातच 2025 या नवीन वर्षात सहजयोगाच्या प्रचार प्रसाराला गती मिळावी व जास्तीत जास्त नवीन साधकांना सहजयोग ध्यान साधनेचा लाभ मिळून पमेश्वरी शक्तीशी योग प्राप्त होऊन प्रत्येकाला जिवनात आनंद, प्रेम, शांती, समाधान व अनेकविध फायदे सहज योग ध्यान साधने द्वारे प्राप्त होण्यासाठी युद्ध पातळीवर विश्वात कार्य सुरू आहे. सहजयोग सर्वांपर्यंत पोहचावा, सर्व साधकांना आत्मसाक्षात्कार मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन चिमूर सहजयोग सामुहिकतेच्या वतीने करण्यात आलेले आहे. अशातच श्री माताजींचे उत्तम माध्यम डॉक्टर संदीप दलाल हे आपल्या सुमधुर वाणीतून विश्वाच्या अनेक भागात भजन प्रस्तुतीच्या माध्यमातून आत्मसाक्षात्काराच्या कार्यास आपले मोलाचे योगदान देत आहे.तरी या कार्यक्रमाकरिता चिमूर तालुका समन्वयक श्री प्रवीण साटोणे व तालुका समितीच्या वतीने या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहजयोगी बंधू भगिनींनी स्वतः उपस्थित राहून व जास्तीत नवीन साधकांना आपल्या सोबत आणून नवीन साधकांना आत्मसाक्षात्कार मिळवून देण्यासाठी कार्य करून कार्यक्रमाचा आनंद घेऊन श्री माताजींना नवीन वर्षात एक उत्तम भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तसेच सहजयोग परिवारातील सर्व सहजयोगी बंधू भगिनी यांनी चिमूर या ठिकाणी होत असलेल्या या कार्यक्रमाची सुचना चिमुर व परिसरातील आपल्या नातलगांना व परिचीतांना देवून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करून सहजयोग प्रचार प्रसाराला, सहजयोगाच्या कार्याला गती देण्याचे कार्य करण्याचे आव्हान चिमुर तालुका सहज योग समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
*कार्यक्रमाचे स्थळ*
*शेतकरी भवन, मेन रोड हजारे पेट्रोल पंप समोर चिमूर, तालुका चिमूर जिल्हा: चंद्रपूर*
*अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क करा*
१)श्री प्रवीण साटोणे
तालुका समिती समन्वयक चिमूर
मोबाईल नंबर:९९२२२५२०५५
२)श्री नथ्युजी चौखे
तालुका समिती उप-समन्वयक चिमूर
मोबाईल नंबर:८८८८५७०७५७
३)श्री कापेश्वर दाभेकर
तालुका वित्त समिती प्रमुख चिमुर
मोबाईल नंबर:९९७०६०२३३९
जय श्री माताजी