spot_img
2 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

देवडी येथील राणुबाई देवीची १५ जानेवारीला यात्रा

महाराष्ट्रातून हजारो भाविक येणार;गुरूवारी कुस्त्यांचा कार्यक्रम


सरपंच अतुल झाटे यांची माहिती
वडवणी | प्रतिनिधी
तालुक्यातील देवडी येथे पौष पोर्णीमेला राणुबाई देवीचा मोठा यात्रा महोत्सव भरत असतो. यावर्षी पौर्णिमा आणि मकरसंक्रांत एकाच दिवशी आल्यामुळे यात्रा बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी भरणार असून या यात्रा महोत्सवासाठी येणार्‍या व्यापार्‍यांची व भावीकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना जागा उपलब्धकरुन देणे,पाणी लाईट व्यवस्था वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती गावचे सरपंच सरपंच अतुल झाटे यांनी दिली.


वडवणी पासून उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर साडेचार हजार लोकसंख्या असलेले देवडी एक सदन गाव आहे.या ठिकाणी पूर्वीपासूनच नवसाला पावणारी रानुबाई देवी म्हणून प्रसिद्ध आहे.या ठिकाणी मोठे देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील हजारो भावी भक्तांच्या आराध्य दैवत राणूबाई देवी कडे भाविक भक्त नवस बोलतात व ही देवी भाविक भक्तांचे नवसही पूर्ण करते आणि ते देवीचे नवस फेडण्यासाठी गेली नऊ दिवस झाले अंगाला हळद लावून हे भाविक भक्त कोणालाही स्पर्श न करता देवीच्या दरबारामध्ये नऊ दिवस पूजा आराधना करत असतात.या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण गावातील देवी भक्त उपवास करत असतात.या नऊ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध आराधी मंडळ,भारुड,गवळणी आधी भरगच्च कार्यक्रमांची गावकर्‍यांना मनोरंजन पर मेजवानी असते.देवडी गावातील व पंचक्रोशीतील माहेर वासिनी लेकी बाळी आपल्या लाडक्या रानुबाई देवीची खना नारळाची ओटी भरण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पौष पोर्णीमेला हजेरी लावत असतात.नवस करणारे देवीभक्त आठ दिवस अंगाला हळद लावून पूजाआराधना करून नवव्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेला गुलालाची व लेवड्यांची उधळण करत देवीचा गजर करत या यात्रा उत्सवामध्ये बुधवार दि १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वा गाड्या ओढण्यात येणार आहेत. तर गुरूवार दिनांक १६ जानेवारी रोजी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त गावात यात्रेची जोरात तयारी सुरू असून या वर्षी गावात विविध योजनेतून ७३ लक्ष्य रुपयाच्या ग्रामपंचायतने पथ दिवे सोलार हाई मस्ट व सौर पथ दिवे चे काम केले व ७ लक्ष्य रू. चे अंडरग्राऊड नाली चे काम पूर्ण व येणार्‍या यात्रे करू साठी सर्व सुविधा ग्रामपंचायत पुरवण्यात आल्या असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन गावचे सरपंच अतुल झाटे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या