spot_img
13.6 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

spot_img

सोशल मिडीयावर दहशत पसरविणारी पोस्ट वायरल अथवा फॉरवर्ड केली तर कारवाई-पोलिस अधिक्षक  

बीड : बीड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री नवनीत कॉंवत यांनी जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, कोणीही मोबाईल व इंटरनेटचा वापर करुन आपल्याकडे असलेले वैध अथवा अवैध शस्त्राचे (फोटो व्हीडीओ) सोशल मिडीयाव्दारे प्रदर्शित करु नये. तसेच एखाद्या मारामारीच्या घटनेतील रेकॉर्ड केलेला फोटो/व्हीडीओ, शिव्या देतांनाचा व्हिडीओ अथवा समाजात दहशत किंवा भिती निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मिडीया अकाउंटवरुन शेअर करु नये, अथवा फॉरवर्ड करु नये. तसेच ज्यांनी कोणी यापुर्वी अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मिडीयाव्दारे प्रदर्शित केल्या असतील/शेअर केल्या असतील किंवा फॉरवर्ड केल्या असतील त्या त्यांनी तात्काळ सोशल मिडीयावरुन डिलिट कराव्यात.
समाज माध्यमांवर (सोशल मिडीया) अशा प्रकारे कोणीही शस्त्राचे, मारामारीचे अथवा शिवीगाळ केल्याचे किवा ज्यामुळे समाजात भिती व दहशत निर्माण होईल असे फोटो व्हीडीओ प्रदर्शित करील, लाईक करील किंवा फॉरवर्ड करील तसेच ज्यांनी कोणी यापुर्वी सोशल मिडीयावरुन अशा पोस्ट केल्या आहेत. परंतू आम्ही दिलेल्या सुचनेनंतरही त्या पोस्ट डिलिट केल्या नाहीत. तर अशा व्यक्तींविरुध्द तात्काळ भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर कायद्यान्वये योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्या