spot_img
26 C
New York
Thursday, June 12, 2025

Buy now

spot_img

सोेलापूरात शिवशाही बस जाळली

परभणी घटनेचे पडसाद
सोलापूर : परभणी घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात अज्ञात चार ते पाच आंदोलकांनी शिवशाही एसटी बस जाळल्याचा प्रकार घडला आहे.
परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सोलापुरात काही संस्था, संघटनांनी मोर्चा काढला होता. याशिवाय काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदनही दिली होती. सोमवारी सायंकाळी सोलापुरात तीन एसटी बसेस वर दगडफेक झाली होती. आज पहाटेच्या सुमारास एमएच ०६ बीडब्लू ०५८९ ही बस पेटविण्यात आली.सोमवारी सायंकाळी सोलापूरहुन तुळजापूरला जाणार्‍या दोन गाड्या आणि सोलापूरहुन सातार्‍याला जाणार्‍या एका बसवर दगडफेक करण्यात आली होती. डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात या घटना घडल्या होत्या. सध्या सोलापूर एसटी आगारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलकांना शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या