ज्ञानेश्वर काकड । नाशिक
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आडवा फाटा कार्यालय सिन्नर , नाशिक पुणे महामार्ग सिन्नर ,येथे मौजे दोडी खुर्द येथील नागरे वस्ती मधील ट्रांसफार्मर वरील फेस पेटी बॉक्स नवीन मिळणे बाबत विठ्ठल हरक साहेब उपकार्यकारी अभियंता सिन्नर उपविभाग 2 सिन्नर यांना सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी निवेदन स्वीकारताना पी.व्ही. मुंगसे मॅडम सहाय्यक अभियंता सिन्नर यांनी स्वीकारले.या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की मौजे दो डी खुर्द तालुका सिन्नर येथील नागरे वस्तीवर ट्रांसफार्मर बसवलेला आहे ,परंतु येथील ट्रांसफार्मर वरील फेज पेटी पूर्णपणे खराब झालेली आहे. सदरील भागात विजेचा दाब नियंत्रित नसल्याकारणाने वारंवार फेस पेटी पूर्णपणे खराब होते ,तेथील शेतकरी वर्ग तारीची वायर टाकून फेस पेटीचा उपयोग करत असल्यामुळे विजेचा शॉक लागून जीवित हानी होऊ शकते, तेथील शेतकरी वर्गाच्या तीस ते पस्तीस कनेक्शन या ट्रांसफार्मर वरती असून शेतीमालाला पाणीपुरवठा करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे, या ट्रांसफार्मर वरती आव्हाड ,कांगणे, नागरे ,दराडे ,व साबळे अशा विविध शेतकर्यांचा वीज पंप सुरू आहे ,सदरील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे .तरी मे. साहेब आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करून या ट्रांसफार्मर वरती नवीन फेस पेटी बसवण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनाची प्रत माननीय श्री दीपक कुमठेकर साहेब .मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक ,व माननीय श्री राजाराम डोंगरे साहेब मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक ग्रामीण यांना पाठवण्यात आले आहे.