spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

जखमी चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

केज : केज-कळंब रोडवर मंगळवारी (दि. २६) रात्री १०. ३० च्या सुमारास केजपासून जवळ असलेल्या कमल पेट्रोल पंपाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली ट्रॅक्टर चालवीत असलेल्या चालकाचा मागच्या चाकाखाली चिरडून अपघात झाला होता. त्या चालकाचा आज (दि.२७) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री १०. ३० च्या सुमारास रावसाहेब शहाजी टेले (रा. धाराशिव) हे उसाचा ट्रॅक्टर चालवीत केजच्या दिशेने कारखान्याकडे जात होते. यावेळी कमल पेट्रोलियम पंपाजवळ त्याला ट्रॅक्टर चालवित असताना अचानक डुलकी लागल्याने तो खाली पडला. खाली पडताच तो चालत्या ट्रॅक्टरच्या मागच्या टायर खाली आला. कमरेच्या खालील भागावरून टायर गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.
जखमी रावसाहेब टेले याला चालक सुमित तेलंग याने रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान, आज पहाटे ४.३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातातील जखमी रावसाहेब टेले याला अजय बचुटे, सौरभ वरपे, सुमित तेलंग आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांनी मदत करून त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याची मदत केली.

ताज्या बातम्या