spot_img
10.7 C
New York
Tuesday, May 20, 2025

Buy now

spot_img

पालीच्या तलावात मृतदेह

बीड : शहरापासून काही अंतरावर असलेल्या पालीच्या धरणात एका ४० ते ४५ वय वर्षे असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील व्यक्तीचा मृतदेह हा सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने ओळख पटविण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहेत.
बीड शहरापासून जवळ असलेल्या बिंदुसरा पालीच्या धरणामध्ये स्थानिकच्या काही लोकांना एका अनोळखी इसमाचे प्रेत ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. या व्यक्तीस जरी कोणी ओळखत असेल तर त्यांनी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या