अब्रू नुकसान खटल्यात
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांना अब्रु नुकसान खटल्यात दोषी ठरविण्यात आले असून कोर्टाने त्यांना १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली असून त्यांना अटक करण्यात येते का? हे पहावे लागणार आहे.
मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता. कोरोना काळात शौचालयात घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंब गुंतल्याचे व्यक्तव्य केले होते.त्यानुसार मेधा किरीट सोमय्या यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आज कोर्टाने केसचे वाचन केले. त्यामध्ये खा.संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रूपयांची शिक्षा सुनावली आहे.