spot_img
9.3 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img

देव द्या देवपण घ्या…! द मायभूमी युथ फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
सिन्नर तालुक्यातील नायगांव गावातील द मायभूमी युथ फाउंडेशन व झेप सामाजिक विचार मंचाच्या संयुक्त विद्यामानाने गोदा घाटावर गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. गणेशमूर्तींचे नदीत होणारे विसर्जन व त्यातून उद्भवणारी जलप्रदूषणाच्या समस्या पाहता गणेशोत्सवात फाउंडेशनी सक्रिय पुढाकार घेत नायगाव परिसरांतील २११ पेक्षा जास्त गणेश मूर्तीचे संकलन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
प्रदूषण हा संपूर्ण जगासमोरील मोठा प्रश्न आहे. त्यात गणेश विसर्जनाप्रसंगी होणारे प्रदूषण हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अधिकाधिक मूर्तींचे संकलन करून जलप्रदूषण होण्यास आळा बसावा, या उद्देशाने द मायभूमी फाउंडेशनने हा उपक्रम राबवला. जलप्रदूषणावर एक उपाय म्हणून नायगाव गावात गणपती ’विसर्जना ऐवजी दान करा’ या उपक्रमाला यावर्षीपासून सुरुवात झाली आहे. विशेषतः तरुणांचा उपक्रमात मोठा सहभाग असल्याने या पिढीत पर्यावरण संवर्धनासाठी असलेली बांधिलकी दिसून आली. या उपक्रमाला परिसरांतील नागरीकांनी ऊस्फुर्त असा प्रतिसाद देत गणेश मूर्तींचे दान करुन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. तसेच फाउंडेसनच्यावतीने नागरीकांना शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना का करावी यांचे प्रबोधन केले गेले. व पुढील वर्षी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले.

Creating a resume for startups and entrepreneurs requires a unique approach. Unlike traditional resumes that focus on structured job experience, an entrepreneur’s resume should highlight innovation, leadership, and problem-solving skills. Key sections should emphasize the startup’s mission, any funding rounds, key partnerships, and milestones that demonstrate growth. Entrepreneurs should also showcase their ability to pivot and adapt in the fast-paced startup environment, which is often a vital skill for investors and collaborators to see.

Incorporating a professional resume writing service can help entrepreneurs present their experience and vision effectively. Whether you’re seeking funding, partnerships, or talent for your startup, a well-crafted resume will give you a competitive edge. Our service ensures that your resume reflects your journey as an entrepreneur and communicates your strengths with clarity and professionalism. Get your personalized resume today and boost your chances of success.


गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन मोहिमे करीता पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन लाभले.या मोहिमे प्रसंगी सौरभ जेजुरकर (उपसरपंच), विकास ताजने, नशीब सानप, प्रतीक जेजुरकर, प्रतीक कातकाडे, प्रसाद पानसरे आणि झेप सामाजिक विचार मंच नायगावच्या सर्वच सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन नी तालुक्यातील नायगाव गावातील गोदाघाट या ठिकाणी गणपती विसर्जन पॉईंट ला भेट दिली असता असा अनुभव आला की त्या ठिकाणी नायगाव गावातील द मायभूमी युथ फाऊंडेशन व झेप सामाजिक विचार मंचाचे सदस्य हजर होते. त्यांनी परिसरातील सर्व लहान मोठे गणपती नदी पात्रात विसर्जन न करता फक्त पूजा आरती करून गणपती मूर्तीचे संकलण केले आहे. नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला. गावातील सर्व गणपती मूर्तींचे संकलन करून गोदावरी नदीकाठी एकत्र जमून सर्व गणेश मूर्तीचे योग्य त्या ठिकाणी विसर्जन करण्याचे त्यांनी ठरवले याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटला. त्यानिमित्ताने गावकर्‍यांचे तसेच या ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन करण्यासाठी हजर असलेल्या सर्व पदाधिकारी यांचे आम्ही नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आदरणीय पोलीस अधीक्षक देशमाने साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्यावतीने समस्त गावकर्‍यांना खूप खूप धन्यवाद देतो. असाच उपक्रम प्रत्येक गावकर्‍यांनी राबवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी राबवलेल्या कार्यक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा चिंतितो.
भगवान कोळी
पोलीस उपनिरीक्षक एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन
सध्या बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या जातात. तसेच या मूर्तींना सजवण्यासाठी हानिकारक ठरणारे रंग वापरले जातात. या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले तरी त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत. त्यामुळे जल, वायू प्रदूषणात भर पडते. म्हणूनच आपण आपले सण- उत्सव पर्यावरण पूरक साजरे करणे हि काळाची गरज आहे. त्यामुळे आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पुढच्या वर्षीपासून शाडू मातीच्या गणपती मुर्ती बसवून पर्यावरणाचे रक्षण करूया.
स्वप्निल कातकाडे
द मायभूमी युथ फाउंडेशन

ताज्या बातम्या