spot_img
6.1 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

रोहयोच्या कामाची तक्रार;बीडमध्ये एकास बदडले

बीड रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्याची तक्रार का केली? असं म्हणत एकास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना बीड पंचायत समिती कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत माधवराव शिंदे (रा. निर्मळवाडी ता. बीड) यांनी निर्मळवाडी व कराडवाडी अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्याची तक्रार केली होती. सदरील हा तक्रारदार पंचायत समिती कार्यालयासमोर आला असता त्यास विकास माखले, किशोर माखले, भागवत माखले, ज्ञानेश्वर वाणी या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून चौघा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या