spot_img
22.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

अगोदर ड्रोन फिरले अन् ग्रामस्थांनी चोर पकडला

किल्लेधारूर : बीड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ मध्यंतरीच्या काळात सुरू होता. मात्र आता कुठे वातावरण शांत झाले होते. त्यातच रात्री धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथे एका चोराला ग्रामस्थांनी पकडले असून, पहिल्यांदा ग्रामस्थांना ड्रोन दिसले आणि नंतर चोर दिसले. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका चोराला पकडले असून अन्य दोन चोर पळून गेले.
धारूर तालुक्यातील सोनमोहा गावाजवळ शनिवार (दि.३१) रात्री दहाच्या सुमारास ड्रोन दिसल्याने गावात चोर आल्याचा संशय ग्रामस्थांना आला होता. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते. मात्र काही वेळातच फिरणारे ड्रोन गायब झाल्याने लोक आपआपल्या घराकडे वळले. मात्र मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सोनी मोहा गावाजवळी मुंडे वस्तीवरील तुकाराम मुंढे हे आपल्या मोकळ्या अंगणात झोपले असता त्यांना अचानक जाग आली व चोर दिसल्याने त्यांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. यावेळी वस्तीवरील सर्व लोक झाले आणि त्यांनी, तुकाराम मुंडे यांच्या घराला घेरवा घातला असता त्यांना चोर पळून जाताना दिसला. याचवेळी चोरांनी त्याला पकडले. मात्र आणखी दोन चोर या ठिकाणाहून पळून गेल्याचे समजते. त्यानंतर पकडलेल्या चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या