spot_img
24.8 C
New York
Sunday, June 14, 2026

Buy now

spot_img

माजलगाव,परळी,पाटोदा पोलिस अधिकारी बदलले

बीड : पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्याना नवीन अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. यात परळी शहर, पाटोदा, माजलगाव ग्रामीण,परळी ग्रामीणचा समावेश आहे.
परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना पदोन्नती मिळाल्याने ते जालना लोहमार्गला उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून रघुनाथ नाचण परळी शहरचा पदभार घेणार आहेत.पाटोदा शहरसाठी पोलीस निरीक्षक सय्यद मजरअल्ली माजलगाव ग्रामीणसाठी पुन्हा एकदा बालक कोळी यांच्याकडे जवाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पाटोद्यावरून सपोनि अनमोल केदार परळी ग्रामीणला गेले आहेत.

ताज्या बातम्या