spot_img
27.4 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

पेठ बीड पोलिसांनी दुचाकी चोर पकडला

बीड : तालुक्यातील वडगाव गुंधा येथील व्यक्तीची दुचाकी चोरी झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत रमाईनगर येथील एका चोराला पकडले आहे.
बीड तालुक्यातील वडगाव गुंधा येथील प्रभू रत्नराव मोरे हे दि.२६ ऑगस्ट रोजी रात्री लघुशंकेसाठी थांबले असता,त्यांची चक २३इए २७७४ हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची दुचाकी चोरांनी पळवली.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तात्काळ पेठ बीड पोलीसांनी घटनेचे स्थळ व आरोपीची माहिती काढून सचिन विश्वनाथ पाटोळे रा.रमाई नगर बीड या दुचाकीचोरास ताब्यात घेतले असून पुढील तपास पो.हे.सोनवणे करत आहेत. ही कारवाई बीड बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज, पोलीस उपनिरीक्षक शेख रियाज,पो.हे.शेख नसीर,पो.हे. विठ्ठल देशमुख, सुभाष मोटे, बास्टेवाड,चालक शेख असद यांनी केली.

ताज्या बातम्या