spot_img
15 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या महंत रामगिरी महाराजांवर बीड,गेवराई,आष्टीत गुन्हे दाखल

बीड: सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनावेळी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याविषयी मुस्लीम समाजात संतप्त पडसाद उमटत असतानाच आता महंत रामगिरी महाराजांवर पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील बीड , गेवराई आणि आष्टी पोलीस ठाण्यात महंत रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यामुळे महंत रामगिरी महाराज आणि विरोधात तीव्र पडसाद उमटले होते. याच अनुषंगाने जिल्ह्यातील बीड शहर गेवराई आणि आष्टी पोलीस ठाण्यात महंत रामगिरी यांच्याव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहातील प्रचारादरम्यान मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहे. त्यामुळे बीडमध्ये देखील मुस्लिम बांधव आक्रमक झाले होते. महंतांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली. आणि याच अनुषंगाने एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर गेवराईत सय्यद हुसेने यांनी महंत रामगिरी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. आष्टी पोलीस ठाण्यात नाजीम शेख यांनी भावना दुखावल्याची तक्रार दिली होती.
बीड पाठोपाठ महंत रामगिरी महाराज यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत झालेली आहे. मुंबईच्या पायधुनी पोलिस ठाण्यात महंत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराज यांनी हेतूपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होतील, असे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पायधुनी पोलिस ठाण्यात महंत रामगिरी महाराजांविरोधात कलम १९६(१),(अ), २९९,३०२,३ ५२,३५३(२), ३५३(३),३५६, भा.न्या.संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. पोलीस आता महंत रामगिरी यांच्यावर अटकेची कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्या