spot_img
27.4 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

कंकालेश्वरमध्ये तरुणाची आत्महत्या

बीड : शहरातील प्रसिद्ध पुरातन मंदिर असलेल्या कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात आज पहाटे एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. पेठ बीड पोलिसांनी सकाळी सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून मृताची ओळख पटविणे सुरु असल्याची माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली.
बीड शहरातील प्रसिद्ध असलेल्या कंकालेश्वर मंदिरात काल रात्री एका २५ वर्षीय तरुणाने पाण्याने भरलेल्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासातून मृताच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे ही आत्महत्याच असल्याचा दावा करण्यात येतं आहे. सदर तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. पेठ बीड पोलीस या घटनेचा तपास करीत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते.

ताज्या बातम्या