spot_img
28.2 C
New York
Wednesday, May 20, 2026

Buy now

spot_img

एकतर्फी प्रेमातून डॉक्टर तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर : प्रेम विवाह केल्याने जावयाची हत्या केल्याचं प्रकरण ताज असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरानगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली होती. बापानेच जातीभेदापोटी मुलीचे कुंकू पुसले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच आता बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये असे म्हणून आरोपी विद्यार्थिनीला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम केलं नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकीही या तरुणाने या विद्यार्थिनीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या बीएचएमएसच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या गायत्री दाभाडे या तरुणीने हॉस्टेलमध्येच गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तू गायके याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या