spot_img
2.5 C
New York
Tuesday, March 24, 2026

Buy now

spot_img

केज येथे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार मेगा पब्लिक प्रोग्राम

केज : येथे १२ एप्रिल २०२६ रोजी श्री माताजी निर्मला देवीजी यांच्या कृपाशिर्वादाने आत्मसाक्षात्कार पब्लिक प्रोग्राम भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त साधकांनी या महान कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कलियुगाचे वर्णन गोंधळाचे युग असे केले आहे. त्यामुळे वस्तू, वस्तू, नातेसंबंध इत्यादींप्रमाणेच धर्म आणि धार्मिकतेतील गैरसमज आणि शंका यांचा समावेश सर्वत्र दिसून येतो आणि एकाच निर्मात्याने निर्माण केलेली सृष्टी वेगवेगळ्या आवरणाखाली गुंडाळलेली दिसते. जो वेगवेगळ्या मार्गातून आलेल्या सत्याच्या साधकांना त्याच्या मूळ शाश्वत सत्याची आणि तेही सत्यतेची ओळख करून देतो. ज्याप्रमाणे हिमालयातील एकाच उगमातून अनेक नद्या उगम पावतात, ज्यांचा मार्ग, व्याप्ती, रंग आणि पाण्याचे स्वरूप भिन्न आहे.पण शेवटी सर्व काही महासागरात मिसळून पुन्हा बाष्पीभवन होऊन स्वतःच्या स्रोताचे माध्यम बनते. सहज हा समुद्र आहे जिथे मतभेद संपतात. आणि तुमचा सर्वोच्च शक्तीशी थेट संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे सर्व समावेशक पद्धतीने चालण्याचा मार्ग श्री माताजींनीने सर्व जगाला दिला आहे . त्याच मार्गाने चालण्यासाठी आणि श्री माताजींचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपण जास्तीत सहजयोगचा प्रचार प्रसार केला पाहीजे . त्याच अनुषंगाने दिनांक १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ रोजी परमपूज्य श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने केज येथील विठाई मंगल कार्यालय या ठिकाणी आत्मसाक्षात्कार आणि कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि.११ रोजी सायंकाळी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील सहजयोगा हेल्थ अँड रिसर्च सेंटरचे डॉ.अरुण डोंगरे सर यांचे मेडिकल सेमिनार आयोजित केलेले आहे. तर १२ एप्रिल रोजी ४.३० वाजता मेगा रॅली व ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार सोहळा होईल. त्यामुळे जास्तीत जास्त साधकांनी या महानकार्यात आपला सहभाग नोंदवावा आणि श्री माताजींनी आपल्या खांद्यावर दिलेली प्रसार प्रचाराची जिम्मेदारी पार पाडावी.
बाहेर गावावरून येणार्‍या साधकांसाठी निवास व्यवस्था विठाई मंगल कार्यालय धारूर रोड, केज, जिल्हा बीड. येथे करण्यात आलेली आहे. केज येथे येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन परळी आहे. परळी ते केज ६० किलोमीटर आहे. घाटनांदूर रेल्वे स्टेशन फक्त पॅसेंजर गाडी थांबते. घाटनांदूर ते केज ५० किमी आहे. जवळील बस स्टँड केज व आंबेजोगाई आहे. अंबाजोगाई ते केज ३५ किलोमीटर आहे.
तरी काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
९९७५८३६१५७
७७०९०८४५४५
९६२३६०८२८२
७९७२५८४६३६
९८५०१९७८५८
९८२२९१३४९१
९६८९०६१५१८
९८८१५३४७४८
९८९०८७७८४०
९१७५०२६११८
७३८५५१८०३०
९४२१३३७२५०
८९८३५६२०५७
८८८८३६३२२१
९६२३६०८२८२
९९२३५३०९६९
८६२३८४८०६३
९३२५०४८४१३
९४२३७८५७५४
८९९९९०५१९९
९५०३३८४०८४
८८०६९९८००६

ताज्या बातम्या