spot_img
30.5 C
New York
Friday, June 19, 2026

Buy now

spot_img

कृषी कुंभ २०२६ मध्ये विठ्ठल रखुमाई सेंद्रिय शेती शेतकरी गटाचा सन्मान

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
नाशिक येथे आयोजित कृषी कुंभ २०२६ कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विठ्ठल रखुमाई सेंद्रिय शेती शेतकरी गट यांना उत्कृष्ट सेंद्रिय शेती गट या शेतकरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. या गौरवप्रसंगी गटाचे अध्यक्ष कमलाकर रामराजे यांना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीणजी गेडाम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


या सत्कार सोहळ्यास जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, सिन्नर कृषी अधिकारी नाटे साहेब, उप कृषी अधिकारी रणजीत आंधळे साहेब, सिन्नर तंत्रज्ञान सहाय्यक गोकुळ जाधव साहेब, सहायक कृषी अधिकारी योगिता घोरपडे मॅडम तसेच सानप ऍग्रो इंजिनियरिंगचे संचालक रामदास भाऊ सानप उपस्थित होते.
यावेळी कृषी सखी रूपाली रामराजे, उज्वला जेजुरकर, गटाचे सचिव दिलीप गीते, रोशन महाराज पालवे, हरिभाऊ गीते, अशोक आव्हाड, रघुनाथ गीते, अशोक रामराजे, तानाजी गीते, बाळू जेजुरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
विठ्ठल रखुमाई सेंद्रिय शेती शेतकरी गटाने सेंद्रिय पद्धतीने शेती करून इतर शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. रासायनिक शेतीमुळे मातीचे आरोग्य व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
सेंद्रिय शेतीमुळे शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासही मोठी मदत होते. त्यामुळे अधिकाधिक शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन गटाचे अध्यक्ष कमलाकर रामराजे यांनी केले. सानप ऍग्रो इंजीनियरिंग चे संचालक रामदास भाऊ सानप यांनी गटातील सर्व उपस्थित शेतकर्‍यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या