जिल्हा व सत्र न्यायधीश यांचा महत्वपूर्ण निकाल
बीड : दिनांक. २९ मार्च २०२२ रोजी आरोपी याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, छेडछाड व विनयभंग करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गेवराई तालुक्यातील रा. दिमाखवाडी या गावचा रहिवासी असलेला आरोपी नामे. मनेश उर्फ बाळु गंगाधर जायगुडे यास मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ व्यंकटेश एच. पाटवदकर साहेब यांनी आरोपीला दोषी ठरवून ६ महिने करावास व १,०००/रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना कारावास एवढ्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सहा सरकारी वकिल अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी काम पाहिले.
या प्ररकणी थोडक्याात हकिगत अशी की, दिनांक २९ मार्च २०२२ रोजी सकाळी ०८.०० ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. माझी मुलगी बीड येथे शाळेमध्ये शिक्षणासाठी असतांना व तिचे गावी येथे मागील सहा महिन्यापासुन तिचा सतत पाठलाग करून तिची छेडछाड करून तु मला खुप आवडतेस असे म्हणुन तिचा विनयभंग करून तिची गावात बदनामी केलयाचे आरोपीचे त्रासाला कंटाळुन तिने लोखंडी अंगलला दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली.
पिडीतेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गेवराई येथे आरोपी विरूध्द कलम ३०५, ३५४, ३५४-ड भादवी आणि कलम १२ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध्द कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरून तात्कालील उपविभागीय अधिकारी गेवराई श्री. स्पप्निल आर. राठोड यांनी या प्रकरणाचा तपास केला व जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणी सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ व्यंकटेश एच. पाटवदकर साहेब बीड यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण ०९ साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणत पिडीता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांचा पुरावा व सहा सरकारी वकिल अजय श्रीमंतराव तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ व्यंकटेश एच. पाटवदकर साहेब यांनी आरोपी यास कलम ३०५, ३५४, ३५४-ड भादवी आणि कलम १२ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध्द कायदा सन २०१२ प्रमाणे ६ महिने साधा करावास व १,०००/रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास एवढया दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात सहा सरकारी वकिल अजय श्रीमंतराव तांदळे यांनी काम पाहिले. उपविभागीय अधिकारी आष्टी श्री. गेवराई श्री. स्पप्निल आर. राठोड व कोर्ट पैरवी अधिकारी पोष्ट गव्हाणे, सपो पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती सविता चव्हाण यांनी सहकार्य केले.


