spot_img
9 C
New York
Tuesday, March 10, 2026

Buy now

spot_img

दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार १५ हजार रुपये मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी याबाबत माहिती दिली आहे.
स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून डीबीटी द्वारे थेट दिव्यांगांच्या खात्यावर निधी जमा केला जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मदत होणार आहे.
तब्बल तीस वर्षानंतर टूलकिट खरेदीच्या रक्कमेत १५ पट वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेत १००० रुपये अर्थसहाय्य देण्यात होते. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी निर्माण होईल.
दिव्यांग व्यक्ती आपल्या कौशल्यानुसार व्यवसाय करु शकतात. शिवणकाम, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर असे अनेक व्यवसाय ते करु शकतात. परंतु अनेकदा सामान घेण्यासाठी पैसे नसल्याने अडचणी येतात. याचसोठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज करणार्‍या अर्जदाराने शासकीय संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा करतात.या योजनेसाठी तुम्ही  https://divyangsahayakportal.maharashtra.gov.inया वेबसाइटवर जाऊन नोंदणी करु शकतात.

ताज्या बातम्या