भुम : विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भुम येथील मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग तसेच आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “Post-Pandemic Reflections in Literature & Media (मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांच्या संदर्भात)” या विषयावर दिनांक 04 आणि 05 मार्च, 2026 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. या सेमिनारमध्ये देशातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संशोधन निबंध सादर केले.
सेमिनारच्या पहिल्या दिवसाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे विद्या विकास मंडळ पाथरूडचे सहसचिव व प्राचार्य डॉ. संतोष शिंदे होते. कार्यक्रमात उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत मिसाळ (हिंदी विभाग, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, पुणे) आणि प्रमुख व्याख्याते विद्या विकास मंडळ पाथरुडचे पदाधिकारी आणि माजी प्राचार्य डॉ. एस.एन.सिंह, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे (वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी) उपस्थित होते. तर विशेष व्याख्याते म्हणून डॉ. दिलीप चव्हाण (इंग्रजी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौतम तिजारे यांनी केले, प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजश्री तावरे यांनी मानले. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रशांत गायकवाड, डॉ.संजय साठे, सारिका उबाळे, डॉ.अरुण गंभीरे, डॉ.ओमप्रकाश लोकरे यांनी विचारमंथन केले तर अध्यक्षता डॉ. गजेंद्र रंधील यांनी केली. सुत्रसंचलन प्रा. पवार एल.बी. यांनी केले तर आभार डॉ .एन.आर. जगदाळे यांनी मानले.

सेमिनारच्या दुसऱ्या दिवशी चौथ्या आणि पाचव्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ. दत्ता साकोळे, प्रो. डॉ. सदाशिव माने, प्रो. डॉ. रमेश कांबळे, प्रो. डॉ. शीतल बियानी प्रो. डॉ. सुभाष शिंदे उपस्थित होते. तर डॉ. अंजली वाघमारे, प्रा. लक्ष्मण धावारे, प्रा. नवनाथ झेंडे यांनी शोध निबंध वाचन यांनी केले. या सत्रांचे सुत्रसंचलन प्रा. गोविंद गरड आणि आभार डॉ. शितल अलगुंडे यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळ पाथरुडचे उपसचिव तथा प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, डॉ. गोविंद कोकणे, प्रो.डॉ. प्रशांत मोटे, प्रो. डॉ. मीना जाधव हे होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे या होत्या. याचे सूत्रसंचालन प्रा. पवार एल. बी. यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. राजश्री तावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल राठोड यांनी केले. या राष्ट्रीय सेमिनारमध्ये महामारीनंतरच्या काळातील साहित्य व माध्यमांमधील बदल, मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव, एकाकीपणा, नैतिकता आणि डिजिटल माध्यमांची भूमिका यावर विविध सत्रांमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीत डॉ. संतोष भांडवलकर आणि अन्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

