spot_img
-1.4 C
New York
Wednesday, February 25, 2026

Buy now

spot_img

संत गाडगे महाराज जयंती ब्राह्मणवाडे येथे उत्साहात साजरी

 जिल्हा परिषद शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्राह्मणवाडे :  संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ब्राह्मणवाडे येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा, ब्राह्मणवाडे येथे  सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोली नाशिक यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी सरपंचविलास गिते,पोलिस पाटील कमलाकर रामराजे,शाळेचे मुख्याध्यापक पगारे मॅडम, शिक्षकवृंद, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप गिते व  तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोफत्र नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. गरजू रुग्णांना योग्य सल्ला देण्यात आला तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून या उपक्रमाबद्दल पालकांनी, ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर स्वच्छता, समाजप्रबोधन आणि सेवा यांचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेले हे मोफत नेत्र तपासणी शिबिर त्यांच्या विचारांना साजेसे ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी, सर विश्वेश्वराय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोली नाशिकचे प्राचार्य डॉ.सारंग पांडे, डॉ.विठ्ठल विखे, डॉ. इरफान सय्यद, डॉ.सविता कुंदे,सरपंच, पोलिस पाटील व मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी ह्यांचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक रामदास भाऊ सानप, माजी सरपंच सुनील नाना गीते, भाऊसाहेब रामराजे, माळी सर, संजय गीते, शुभम गिते, रोशन पालवे, अनिल गिते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या