spot_img
22.3 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img

धामोरीत मेगा पब्लिक प्रोग्राम

अहिल्यानगर : परमपूज्य यांच्या परमकृपेत आणि आशीर्वादाने अहिल्यानगर जिल्ह्यातील धामोरी या ठिकाणी दिनांक २७ जुलै २०२५ रोजी मेगा पब्लिक प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी जास्तीत जास्त साधकांनी या पब्लिक प्रोग्राममध्ये सहभागी होऊन परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात येत असलेल्या श्री क्षेत्र धामोरी या ठिकाणी श्री माताजींनी आपल्या अमृतवाणी उल्लेखित केलेले आद्यसहजयोगी गुरुगोरक्षनाथ यांनी गुरुआडबंगीनाथ यांना धामोरी या ठिकाणी आत्मसाक्षात्कार दिला. तसेच या ठिकाणी श्रीरामांनी मारीच राक्षसाला बाण मारल्यामुळे गोदावरी नदीच्या खडकास भेग पडली आशा पवित्र धामोरी क्षेत्री आत्मसाक्षाकाराचा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आहे.
दिनांक २५ ते २७ जुलै या दरम्यान प्रचार प्रसार होणार आहे तर रविवार २७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुंडलिनी शक्तीची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम पार पडणार आहे. बाहेरगावाहून येणार्‍या साधकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळील रेल्वे स्टेशन कोपरगाव आहे कोपरगाव ते धामोरी अंतर २५ किलोमीटर आहे.शिर्डी ते धामोरी ३५ किलोमीटर आहे तरी येण्यापूर्वी श्री मयूर शिंदे ७७०९४९३१७६ यांना फोन करून यावे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
७०२०८५१५७२
७७०९४९३१७६
९८५८००३५३५
८७८८३४३५३५
९९७५४५३९५३
९८५०१९७८५८
९४२३१६१६८८
९४२३७८५७५४
८९९९९०५१९९
९५०३३८४०८४
८८०६९९८००६
९८५०४८५०७५

ताज्या बातम्या