spot_img
28.4 C
New York
Sunday, June 29, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये साखळीचोर पकडले

बीड :  पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथे ज्योति विजय उदावंत रा.उमरखेड ता.महागाव जि.यवतमाळ यांनी फिर्याद दिली होती की,दि.०७ जून २०२५ रोजी त्यांचे मुली सोबत नातवाचा साखरपुडा बीड येथे असल्याने त्यांचे भाऊ यांचे घरी आल्या होत्या.दि.०८ जून २०२५ रोजी ज्योती व त्यांची मुलगी या साखरपुडयाचे सामान खरेदी करण्यासाठी राजीव गांधी चौक येथे आल्या होत्या.दुपारी ३ वा दरम्यान त्या या रिक्षा मध्ये बसत असताना पाठी मागुन दोन अज्ञात इसम मोटारसायकल वर बसुन आले व फिर्यादी यांचे गळयातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण किं.९०,०००/- रु हे हिसकावुन घेवुन गेले.अश्या वर्णनाच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला होता. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून दोघांना पकडले आहे.
त्याचप्रमाणे दुसर्‍या घटनेत पोलीस स्टेशन बीड शहर येथे दि.८ जून २०२५ रोजी फिर्यादी नामे शिल्पा अमोल वाव्हळ रा.फुलाईनगर ता.जि.बीड यांनी फिर्याद दिल होती की,फिर्यादी हया त्यांचे मुली सोबत खरेदी कामी डी.पी.रोड बीड येथे गेल्या होत्या. फिर्यादी या त्यांची स्कुटी गाडी स्टॅन्डवर लावत असताना फिर्यादी यांचे जवळ तोंडाला बांधुन मोटार सायकलवर बसुन दोन ईसम आले. यातील समोरील ईसमाने डोक्यावर हेल्मेट घातलेले व अंगात पांढर्‍या रंगाचे शर्ट व काळी पॅन्ट व पायात पांढर्‍या रंगाचे बुट घातलेले दिसुन आले.व मागील ईसम हा काळया रंगाचे जरकीन घातलेला व डोक्यावर पिस्ता रंगाची टोपी घातलेला होती.यातील मागे बसलेल्या ईसमाने फिर्यादी यांचे गळयातील मिनी गंठण वजनी १३ ग्रॅम मागे बसलेल्या ईसमाने ओढून घेवुन गेले यावरुन पो.स्टे. बीड शहर गु.र.नं १००/२०२५ कलम ३०४(२),(५) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या दाखल गुन्हयांची माहिती पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत साहेब यांना मिळताच त्यांनी सदरील गुन्हयातील आरोपींना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी लागलीचा पथके नेमुन बीड, आहिल्यानगर, छ.संभाजीनगर येथे रवाना केली. पोउपनि महेश विघ्ने यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा हा आरोंपी नामे १.सुमीत सुभाष रुपेकर वय १९ वर्ष रा.सजापुर वाळुज ता.जि. छ.संभाजीनगर २.अजय संजय पंडीत वय २० वर्षे रा.निपाणी वडगाव ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर यांनी मिळुन केला आहे.व सदरचे दोन्ही आरोपी हे श्रीरामपुर येथे अशोकनगर भागात आहेत. यावरुन श्रीरामपुर येथे जावुन दोन्ही ईसमांना ताब्यात घेतले. सदरचे दोन्ही आरोपीतांनी वर नमुद गुन्हे केले असल्याची कबुली दिली.सदर गुन्हयात गुन्हा करतवेळी वापरण्यात आलेली आरोपी क्रं.०१ याची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.ऊर्वरीत मुद्येमालाचा शोध स्था.गु.शा.बीड व पो.स्टे.शिवाजीनगर करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत बीड, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर , पोनि श्री शिवाजी बंटेवाड,स्थागुशा,बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, राहुल शिंदे, महेश जोगदंड, राजु पठाण, बप्पासाहेब घोडके, गणेश मराडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या