वडवणी : तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सुरज पांडुरंग कोळपे याने एम एच सी इ टी परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त करून यश प्राप्त केले. सुरज कोळपे याने मिळविलेल्या यशाबद्दल अशोक माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला . तसेच संस्थापक अध्यक्ष सर्जेराव काळे व युवा नेते ऍड. आनंद काळे , प्राचार्य श्री.सावंत व सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.