नाशिक । ज्ञानेश्वर काकड
शैक्षणिक वर्ष २०२५ च्या पहिल्या दिवसाची सुरुवात शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे, विद्यालयात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी नवीन प्रवेश इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे जेष्ठ विश्वस्त नामदेवराव काकड पोलीस पाटील सांगळे शालेय समितीचे पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,गावातील ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प,बोलपेन खाऊ देऊन स्वागत करण्यात आले .
यावेळी ढोल पथक लेझीम पथकाने विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विश्वस्त यांचा सत्कार शाळेच्या वतीने पी आय गीते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला पाहुण्यांना शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मागील वर्षी दहावीत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच मुलांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या . तसेच दहावी त उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या पीआय गीते साहेब यांनी पुढच्या वर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्याच्या पुढे मार्क मिळाल्यानंतर तीन क्रमांकाला ५०००,३००० आणि २००० चे बक्षीस देण्याचे जाहीर केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जी नागरे सर प्रस्ताविक मुख्याध्यापक सांगळे सर कार्यक्रमाचे आभार श्रीमती गंगावणे मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सांगळे सर शिरसाट सर नागरे सर सांगळे भाऊसाहेब गंगावणे मॅडम आणि गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू नवाळे यांनी परिश्रम घेतले.