spot_img
20.8 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img

साठ्ये महाविद्यालयात आत्महत्या

मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात साठ्ये महाविद्यालय  आहे. गुरुवारी सकाळी या मुलीने साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या   केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या मुलीचे नाव संध्या पाठक असे होते. ती 21 वर्षांची असून ती साठ्ये महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. आज सकाळी संध्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर साठ्ये कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. संध्या पाठक हिने आत्महत्या केली किंवा ती पडली, याबाबत अद्याप थोडासा संभ्रम आहे. महाविद्यालय प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयांना ती तिसऱ्या मजल्यावरुन पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे सांगितले. मात्र, हा आत्महत्येचा प्रकार असल्याची चर्चा साठ्ये कॉलेजमध्ये रंगली आहे. संध्या पाठक हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास सध्या विलेपार्ले पोलिसांकडून सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. या घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. संध्या पाठक ही तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तिला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या कुटुंबीयांनी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याचे सांगितले. तिने आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, संध्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. तिला कोणीतरी ढकलेले असावे, असे संध्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या