spot_img
20.3 C
New York
Wednesday, June 24, 2026

Buy now

spot_img

गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून बीडमध्ये हल्ला

बीड : सध्या गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाहनाचा धक्का आणि हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून भररस्त्यावर हाणामारीचा प्रकार घडला. धारदार शस्त्रांसह दगडांनी उघडपणे मारहाण करण्यात आली. या प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बीड शहरातील साठे चौकात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार व्यक्तींमध्ये वाहनाला धक्का लागल्याचा आणि हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाद झाला होता. पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि दगड आणि धारदार हत्यारांचा वापर करत एकमेकांवर हल्ले करण्यात आले.
या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकजण दगड मारताना दिसतोय तर दोघांच्या हातामध्ये कोयत्यासारखे हत्यारं असल्याचं दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणीत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या