spot_img
17.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

हाफिज सईदचा खात्मा? पाकिस्तान हादरला

मुंबई : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक मोठी घटना घडली आहे. २६/११ चा मास्टरमाईंड लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि त्याचा साथीदारावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात हाफिज सईद मारला गेला असल्याचा दावा केला जात आहे. तसेच लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ नेता फैसल नदीम उर्फ अबू कताल याचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
झेलममधील मंगला बायपासजवळ मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. अबू कताल हा सईदचा पुतण्या आहे, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जमात-उद-दावाचा एक बडा नेताही यात जखमी झाला असून त्याची ओळख लपवून ठेवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी हँडलनी केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार कताल याचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर बडा नेता जखमी झाला होता. त्याला वाचविण्यात अपयश आल्याचे सांगितले जात आहे. सईदच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही. काहींनी सईद कराचीमध्ये असल्याचे म्हटले आहे. झेलममध्ये पोलिसांनी गस्त वाढविली असून मुख्य हॉस्पिटलला ये-जा करण्यापासून लोकांना रोखले जात आहे.
हल्ल्यानंतर या बड्या नेत्याला एका अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. यामुळे तो हाफिज सईद होता, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. काही पाकिस्तानी मीडिया दुसरा मारला गेलेला जमात उद दावाचा नेता जफर इक्बाल आहे, असे सांगत आहेत.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कतालने ९ जून रोजी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोरी मंदिरातून परतणार्‍या यात्रेकरूंना घेऊन जाणार्‍या बसवर झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ताज्या बातम्या