spot_img
14.7 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

spot_img

एसपी बारगळांची बदली

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवर मकोका
नागपूर :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत होते. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना आज सभागृहात दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच याप्रकरणातील दोषींवर मोक्का लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर वाल्मिक कराड यांचा एका गुन्हयात सहभाग असून दुसऱ्या गुन्यातील सहभाग आम्ही तपासणार असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आता यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बीडला कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्याच बरोबर संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना दहा लाखाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तर परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या नासधूस प्रकरणाच्या चर्चेवर आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करणारा आरोपी हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर १२ वर्षांपासून उपचार सुरु आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. पण ही घटना कुठल्याही जातीधर्माच्या द्वेषातून घडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परभणीत काही आंदोलकांनी जाळपोळ केली. या प्रकरणी ५१ लोकांना ताब्यात घेण्यात आले. माहिला आणि मुलांना सोडून देण्यात आले. सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले. सामान्य लोकांचेही मोठे नुकसान झाले. काही लोक सीसीटीव्हीत तोडफोड करताना दिसतात. काही लोकांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण ही हिंदू विरुद्ध दलित अशी दंगल नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

ताज्या बातम्या