spot_img
11.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना युबीटी पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, हा निकाला महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित करत ईव्हीएमच्या घोळावरुन संशयही व्यक्त केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा निकाल अंतिम मानून आता पुढील कामकाज करावे लागणार आहे. त्यानुसार, सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांची बैठक मुंबईत होत असून गटनेता व सभागृह नेत्यांची निवड केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाने रविवारी सर्वच आमदारांची बैठक घेऊन मुख्य नेते व गटनेते म्हणून एकनात शिंदे यांची निवड केली आहे. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटी पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आलीय.


मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर,भास्कर जाधव यांच्याकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आलीय. उद्धव ठाकरेंचे विश्‍वासू आणि निकवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारासोबत झालेल्या आजच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोदम म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना युबीटीतील निर्णय होतील.

ताज्या बातम्या