spot_img
24.3 C
New York
Thursday, June 25, 2026

Buy now

spot_img

महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम

भाजपा सर्वात मोठा पक्ष
महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल आज शनिवारी जाहीर होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, प्राथमिक मतमोजणीत राज्यात महायुतीने २१६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात भाजप १२२, शिंदेंची शिवसेना ५७, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ३७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १८, कॉंग्रेस २० आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर आघाडीवर आहे. इतर आणि अपक्ष मिळून २० जागांवर आघाडीवर आहेत.
भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून मुंसडी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी- पाचपाखाडी येथून आघाडीवर आहेत. तर अजित पवार बारामतीतून आघाडीवर आहेत. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी सातव्या फेरी अखेर २८,७४० मतांची आघाडी घेतली आहे.
बारामतीत अजित पवार यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली आहे. निवडणूक आयोगाच्या कलानुसार, बारामतीत अजित पवार १५,३८२ मतांची आघाडी घेतली आहे. २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या आहेत. आता भाजप १२८ जागांवर आघाडीवर असून आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हे मोठे यश मानले जात आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण जागा ९
आघाडीवर असलेले पक्ष…
भाजप – १
शिवसेना शिंदे – ६
राष्ट्रवादी एसपी १
एमआयएम – १

ताज्या बातम्या