spot_img
20.6 C
New York
Tuesday, June 23, 2026

Buy now

spot_img

राज्यात १८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे आणि एकही शिक्षक शाळेत नाहीत अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना आहेत, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले.
शिक्षण आयुक्तालयाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मात्र, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले.
केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे आणि एकही शिक्षक शाळेत उपलब्ध नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा १८ आणि १९ रोजी नियमितपणे सुरू राहतील, असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या