spot_img
15.3 C
New York
Tuesday, October 21, 2025

Buy now

spot_img

बीड-पिंपळनेर रस्त्यावर तरूणाचा खून

बीड : बीड शहरा जवळील बीड पिंपळनेर रस्त्यावर असलेल्या तांड्या जवळील शेतामध्ये एका तरुणाचा सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
अधिक माहिती अशी की, शेख बबलू शेख चांद रा.गांधीनगर बीड वय 32 वर्षे.असे घातपात झालेल्या तरुणाचे नाव असून, तांड्याजवळ शेतामध्ये मृतदेह आढळल्याने स्थानिकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून घात की अपघात आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या