spot_img
4.9 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

बँक व्यवस्थापकासोबत शरीरसंबंध; मागीतली 40 लाखांची खंडणी

छत्रपती संभाजीनगर :एका बँक व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले, त्याचे व्हिडिओ बनवत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 40 लाखांची खंडणी उकळणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 15 ऑक्टोबर रोजी जवाहरनगर पोलिसांनी ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे, बँक व्यवस्थापक कर्ज प्रकरणाच्या फाईली मंजूर करीत नसल्यामुळे आरोपींनी हा कुभांड रचल्याचे समोर आले आहे. आरोपींमध्ये एका संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह महिलेचा समावेश आहे.
सिद्धार्थ ठोकळ आणि एका 26 वर्षीय महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. 37 वर्षीय फिर्यादी एका सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत. कर्ज प्रकरणाच्या फाईली मंजूर करण्याचा त्यांना अधिकार असतो. सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख करून दिलेल्या सिद्धार्थ ठोकळने त्यांच्याकडे कर्जाच्या 40 फाईली नेल्या. वेगवेगळ्या त्रुटींमुळे व्यवस्थापकांनी त्या फाईली फेटाळून लावल्या. त्यामुळे एके दिवशी सिद्धार्थ ठोकळ एका महिलेला सोबत घेऊन आला. तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असल्याचे सांगून बँक व्यवस्थापकासोबत तिची ओळख करून दिली. तिची दहा लाखांच्या कर्जाची फाईल मंजूर करण्याची विनंती केली. मात्र कागदपत्रांची पडताळणी करून ही फाईलही फेटाळण्यात आली. त्यानंतर सिद्धार्थ ठोकळने बँकेत येऊन व्यवस्थापकाला धमकावले. बघून घेतो, असा दम देऊन तो निघून गेला होता.
खंडणीखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. बॅक व्यवस्थापकाला सर्वकाही समजावून सांगितले. 50 हजार रुपयांच्या खर्‍या आणि इतर बनावट नोटांचे बंडल बनवून दिले. आरोपींनी सुरुवातीला मुकुंदवाडी सिग्नल येथे बोलावले, पण पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच विठ्ठलनगर, पुढे रामनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. अखेर, फिर्यादी माघारी निघाल्यावर आरोपींनीच सिडको चौकात त्यांना रोखून पैशांची मागणी केली.
भांबावलेल्या व्यवस्थापकाने त्यांना बोलण्यात गुंतवून न ठेवता कारमधूनच पैशांची बॅग त्यांच्या हवाली केली. ती बॅग घेऊन आरोपी दुचाकीने पळून गेले. पोलिसांनी पाठलाग केला मात्र आरोपी हाती लागले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपासले, मात्र ते पसार झाले होते.
व्यवस्थापकाने कर्ज प्रकरण फेटाळल्यानंतर आरोपी महिलेने सतत फोन करून आणि मेसेज करून व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेगवेगळे हॉटेल, लॉज आणि फार्महाऊसवर नेऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचे चित्रीकरण करून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 40 लाखांची खंडणी मागितली. ठोकळने तर 40 लाख रोकड आणि कर्जाच्या 40 फाईली मंजूर करण्यासाठी ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुझे जीवन उद्धवस्त करू, अशा धमकल्या दिल्या. तसेच व्यवस्थापकाच्या घरी जाऊन प्रत्येकी 20 लाखांचे दोन धनादेशही घेतले.
हिलेच्या प्रकरणात अडकल्यामुळे बॅक व्यवस्थापक तणावात होता. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. मात्र फाईली मंजूर न केल्यामुळे आरोपी ठोकळने आपल्याला या प्रकरणात अडकविले, असे लक्षात आल्यावर त्याने तात्काळ जवाहरनगर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी सापळा रचला.

ताज्या बातम्या