spot_img
19.4 C
New York
Thursday, June 25, 2026

Buy now

spot_img

गुटखा माफिया आबा मुळे अंबडमध्ये पकडला

बीड : जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि विक्री करणार्‍या महारुद्र उर्फ मुळे आबाला सपोनि बाळाराजे दराडे यांनी अटक केली आहे.जालना जिल्ह्यातील अंबड येथून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
दिंद्रुड आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात महारुद्र उर्फ मुळे आबावर गुटखा प्रकरणात गुन्हे दाखल होते. मागच्या अनेक महिन्यापासून तो फरार असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. दिंदृडमध्ये पोलिसांनी पकडलेले गुटखा ७० लाख तर बीड ग्रामीण पोलिसांनी ३० लाखांचा गुटखा ताब्यात घेतला होता. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुळे आबाला अंबडच्या (Aस्ं्) बसस्थानकातून ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून ही कारवाई सपोनि बाळाराजे दराडे यांनी केली.

ताज्या बातम्या