spot_img
22.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये करपरा नदीत आढळला मृतदेह

 

बीड : बीड शहरातून वाहणार्‍या करपरा नदीत सकाळी नऊ च्या सुमारास अंकुशनगर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असून नेमका हा मृतदेह कोणाचा याचा शोध घेतला जात आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आले असून आज सकाळी ९ वाजता बीड शहरातील अंकुश नगर येथील करपरा नदीत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे हे मात्र समजू शकले नाही. मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याचे समजते.

ताज्या बातम्या