spot_img
24.6 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

spot_img

बीड बुंदेलपुरा मस्जिद मध्ये हल्ला!

नागरिकांचा एसपी कार्यालयावर मोर्चा
बीड : शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या मस्जिद मध्ये नमाज साठी जाणार्‍या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या, कुर्‍हाडी, तलवार आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. पवित्र मस्जिद मध्ये घुसून हल्ला करण्याच्या प्रकाराचा मुस्लिम समाजाने निषेध केला आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
पेठ बीड भागातील महेबूब खान आणि जमील गुत्तेदार यांचे गेल्या अनेक दिवसापासून भांडण सुरु होते. महेबूब खान याच्या मुलाने मंगळवारी दुपारी अडीच तीन वाजण्याच्या सुमारास जमील गुत्तेदार हा आपल्या भावासह नमाज साठी मस्जिद मध्ये जातं होता त्याच्यावर हल्ला केला.
नमाज सुरु असताना हा प्रकार झाल्याने उपस्थित लोक तातडीने धावले, त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेत जमील गुत्तेदार व इतर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान पवित्र अशा मस्जिद मध्ये नमाज सुरु असताना घुसून तलवार, चाकू, लाठ्या काठ्या चा वापर करून या पवित्र स्थळाला बदनाम करणार्‍या आरोपीना तातडीने अटक करा अशी मागणी समाजातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

ताज्या बातम्या