spot_img
8.8 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

स्टेट बँकेची‘अमृत वृष्टी योजना’ करतेय मालामाल

गुंतवणूक सुरक्षित राहणे आणि चांगला परतावा मिळावा याकरिता गुंतवणूकदारांमध्ये बँकांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना सुप्रसिद्ध आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना या वेगवेगळ्या कालावधीसाठी असतात व त्यांचा व्याजदर देखील वेगवेगळ्या असतो.
त्यामुळे गुंतवणूकदारांना ज्या योजनेतून चांगले व्याज किंवा चांगला परतावा मिळेल अशा योजनेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते. यामध्ये जर वेगवेगळे बँकांच्या मुदत ठेव योजना बघितल्या तर यामध्ये अनेक विशेष योजना देखील काही बँकांनी आणलेले आहेत. जर आपण देशातील सर्वात मोठी बँक म्हटल्या जाणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या बँकेने नुकतीच एक नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे
व या योजनेचे नाव आहे अमृत वृष्टी योजना होय. याची सुरुवात बँकेच्या माध्यमातून १५ जुलै २०२४ पासून करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मुदत ठेवीवर अधिक व्याज मिळवण्याची संधी मिळणार आहे. गुंतवणूकदारांना या विशेष एफडीमध्ये एसबीआय शाखेतून किंवा इंटरनेट बँकिंग आणि एसबीआय योनो एप्लीकेशनच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे.
एसबीआय अमृत वृष्टी योजनेतून किती व्याज मिळणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टी योजना ही महत्त्वाची योजना असून या योजनेमध्ये ४४४ दिवसांच्या एफडी करिता ७.२५ टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक व्याजाचा लाभ या माध्यमातून मिळेल.
म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी ४४४ दिवसांकरिता एफडी केली तर त्यांना ७.७५ टक्के व्याजाचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे या योजनेत एफडी केल्यावर तुम्हाला त्या एफडीवर कर्ज देखील मिळते.
काय आहे या योजनेचा कालावधी?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत वृष्टी योजनेचा कालावधी १५ जुलै २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत असणार आहे व या योजनेमध्ये तुम्हाला ४४४ दिवसांकरिता पैसे जमा करावे लागणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही योजना सुरू केली
व त्यामधील प्रमुख उद्देश म्हणजे ग्राहकांना अधिक व्याज मिळावे हा असून त्यामुळे ग्राहकांना फायदा होईल व भविष्यासाठी ते बचत करू शकतील. त्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही योजना खूप फायद्याची ठरेल.
मुदतीपूर्वी कसे पैसे काढता येतील?
पाच लाख रुपयांपर्यंतची एफडी जर तुम्हाला मुदतपूर्व काढायची असेल तर त्याकरिता तुम्हाला ०.५०% शुल्क भरावे लागेल. या व्यतिरिक्त पाच लाख ते तीन कोटी रुपयांच्या एफडीवर तुम्हाला एक टक्के शुल्क भरावे लागेल.
महत्वाचे म्हणजे या एसबीआय अमृत वृष्टी विशेष एफडी योजनेचे व्याज मासिक, त्रिमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा केले जाते. त्यामध्ये टीडीएस कापला जातो व त्यानंतर बँक ग्राहकाच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करते.

ताज्या बातम्या